Crime Pudhari
मुंबई

Mumbai Crime News: गेम आयडीच्या वादातून तरुणावर चाकूने वार; तिघांना अटक, चौथा आरोपी फरार

मध्यरात्रीच्या घटनेत हत्येचा प्रयत्न; वाकोला पोलिसांकडून तिघांना अटक, चौथ्या आरोपीचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ऑनलाइन फ्री फायर गेमच्या आयडीवरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १.३०च्या सुमारास कलिना परिसरात घडली.

याप्रकरणी वाकोला पोलिसांनी मुसाहिद वकील अहमद खान, अरबेज शाह आणि कौसर अली जमेल शाह या तिघांना अटक केली आहे. चौथा आरोपी अनस सय्यद याचा शोध सुरू आहे.

तक्रारदार सलमान यांचा भाऊ दिलशाद शाह हा त्याच्या मित्रांसह चर्चच्या पायऱ्यांवर बसला होता. दरम्यान, सलमान आणि त्याचा मूळ गावाकडील मित्र अरबेज शाह यांच्यात फोनवरून वाद झाला. अरबेजला सलमान आणि त्याचा भाऊ दिलशाद हे त्याच्या फेसबुक आयडीवरून फ्री फायर गेम खेळत असल्याचा गैरसमज झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर दिलशाद याला फोन करण्यात आला असता, त्याच्या मित्राने फोन उचलून 'दिलशादच्या गळ्यावर अरबेजने चाकूने वार केला' अशी माहिती सलमानला दिली. सलमान कलिनाच्या दिशेने येत असताना त्याला एक रुग्णवाहिका दिसली.

त्यामध्ये दिलशादसह त्याचे मित्र परवेज आणि अरबेज होते. दिलशादच्या गळ्यावर गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे त्याला दिसले. परवेज आणि अरबेज यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबेजने दिलशादच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सलमान यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT