Fraud by embezzling jewelery in Mumbai
मुंबईत हिरेजडीत दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक Pudhari File photo
मुंबई

मुंबईत हिरेजडीत दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : क्रेडिटवर हिरेजडीत दागिने घेऊन सुमारे ६७ लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी श्रेयांश मदनलाल गोलेचा या व्यापार्‍याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीनंतर श्रेयांशने पलायन केल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

अंधेरी येथे राहणारे तक्रारदार हिरे व्यापारी असून त्यांचा धनजी स्ट्रिट परिसरात हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. श्रेयांश हा व्यापारी असून तो त्यांच्या परिचित होता. चार वर्षांपूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत त्याने त्यांच्याकडून क्रेडिटवर ७२ लाख रुपयांचे काही हिरे तसेच हिरेजडीत बांगड्या घेतले होते. त्यापैकी त्याने पाच लाखांचे पेमेंट केले होते. मात्र उर्वरित पेमेंट देण्याचे आश्‍वासन देऊन तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याची चौकशी केली असता त्यांना श्रेयांशने त्यांनी दिलेल्या हिरे आणि दागिन्यांची परस्पर इतर व्यापार्‍यांना विक्री केली होती. त्यांच्याकडून पेमेंट घेऊनही त्याने त्यांना पेमेंट केले नव्हते.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात त्यांनी श्रेयांश गोलेचाविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही व्यापार्‍यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT