Crime pudhari
मुंबई

Mumbai Gold Seizure : मुंबईत 4.8 कोटींचे विदेशी सोने जप्त

तस्करीत सहभागी विमानतळावरील कर्मचाऱ्याला अटक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ऑपरेशन गोल्ड ड्रॉप मोहीमेतंर्गत महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला अटक केली असून 4 कोटी 80 लाख रुपयांचे तीन किलो विदेशी सोने जप्त केले आहे.

विदेशातून मुंबईत सोने तस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरू असताना एका संशयिताला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्याने विमानतळावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याला तस्करीमार्गे आणलेले गोल्ड दिल्याची कबुली दिली होती. त्यानुसार या कर्मचाऱ्याला या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

तपासात त्याने विदेशातून सोने आणल्यानंतर तो ते सोने परस्पर विमानतळाबाहेर काढून तस्करांना देत होता. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. हा प्रकार उघड होताच त्याच्याविरुद्ध या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवून त्याच्यावर अटकेची कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT