मुंबई

भांडुपमध्ये फुटपाथ खचून सहा दुचाकींचे नुकसान

निलेश पोतदार

भांडुप : पुढारी वृत्‍तसेवा मुंबईच्या मुलुंड परिसरात काल (शुक्रवार) फुटपाथ खचून झालेल्या दुर्घटनेमध्ये सहा दुचाकींचे नुकसान झाले. रात्रीच्या वेळी अचानक केशव पाडा परिसरात एका इमारती समोरील फुटपाथ खचून ड्रेनेज लाईन मध्ये या सर्व दुचाकी कोसळल्या.

महत्त्वाचे म्हणजे दोन वर्षांपूर्वीच या फुटपाथचे काम करण्यात आले होते. परंतु दोन वर्षातच निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या ठिकाणचा काही भाग अचानक खचला आणि कोसळला. ही दुर्घटना घडली त्यावेळी या फुटपाथ वरून फारशी वर्दळ नव्हती. त्‍यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. परंतु या पाच फूट खोल असलेल्या ड्रेनेज लाईन मध्ये या फुटपाथवर पार्क केलेल्या सहा दुचाकी कोसळल्या. यामुळे या दुचाकींचे मोठं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन सदर संपूर्ण भाग हा सील केला आहे. ज्या कंत्राटदाराने असे निकृष्ट दर्जाचे पुटपाथ बांधले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT