Fire near the entrance of Vidhan Bhavan, efforts to control the fire are underway
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशव्दाराजवळ आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या आगीमुळे या ठिकाणी धावपळ उडाली असून, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान या परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.