Ganesh Naik Bungalow Fire at Pavan Gad: मंत्री गणेश नाईक यांच्या पावन गड येथील शासकीय बंगल्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश नाईक यांच्या पावन गड येथील शासकीय निवासस्थानाला अचानक आग लागली.
बंगल्यातून आग लागल्याची माहिती समोर येताच परिसरात चिंता व्यक्त करण्यात आली. दिवाळीच्या काळात फटाके आणि इतर कारणांमुळे आगीच्या घटना घडत असताना मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला आग लागल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, आगीची तीव्रता किती होती आणि या घटनेत बंगल्याचे नेमके किती नुकसान झाले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आगीमुळे बंगल्यातील कोणत्या वस्तूंचे नुकसान झाले आहे, याचीही माहिती मिळू शकलेली नाही.
दुसरीकडे, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेतला जात आहे. बंगल्यातील एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, शॉर्ट सर्किट हेच आगीचे कारण होते का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे शासकीय निवासस्थानांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही चर्चेत आला आहे. सध्या आगीच्या कारणांसह नुकसानीची माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे. संबंधित यंत्रणांच्या तपासानंतर या घटनेबाबत अधिक तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.