FDA Corruption Allegation Pudhari
मुंबई

FDA Corruption Allegation: एफडीए कार्यालयासाठी अधिकाऱ्यांनी वसूल केले 60 लाख; फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स संघटनेची तक्रार

एसीबीने मागितली चौकशीची परवानगी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: फूड लायसन्सधारकांकडून सुमारे 60 लाख रुपये वसूल करून अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाच्या उभारणीसाठी निधी गोळा केल्याचा आरोप फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स संघटनेकडून राज्यातील एफडीए अधिकाऱ्यांवर करण्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत.

या प्रकरणात करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एफडीए आयुक्तांकडे चौकशी सुरू करण्यासाठी परवानगी मागितल्याची माहिती समोर आली आहे.फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स संघटनेचे अध्यक्ष अभय पांडे यांनी ई-मेलद्वारे केलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.

यासंदर्भातील अधिकृत पत्रही समोर आले असून, त्यात अन्न व औषध प्रशासनाकडून आवश्यक चौकशी व तपासासाठी मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात फूड लायसन्सदारावर दबाव टाकून निधी उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित निधीचा वापर एफडीए कार्यालय उभारणीसाठी करण्यात आल्याचा दावा तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT