FDA Pudhari
मुंबई

FDA Illegal Medicine Sales: रुग्णालयांतील मेडिकल एफडीएच्या रडारवर

संबंधित मेडिकल स्टोअरला नोटीस बजावण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यात अवैध औषधविक्री आणि रुग्णांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रुग्णालयांतील मेडिकल स्टोअरची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे.

रुग्णांना विशिष्ट मेडिकल स्टोअरमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडणे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधविक्री, फार्मासिस्टची अनुपस्थिती आणि औषध साठ्यातील अनियमितता अशा प्रकारांवर एफडीएने लक्ष केंद्रित केले आहे.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर तपासणी सुरू असून मुंबईसह विविध शहरांतील रुग्णालयांमधील मेडिकल स्टोअरची कसून छाननी करण्यात येत आहे.

तपासणीत सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमध्ये रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास मज्जाव केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित मेडिकल स्टोअरला नोटीस बजावण्यात आली आहे.

तर छत्रपती संभाजीनगर येथील एका मेडिकल स्टोअरचा औषध विक्री परवाना रद्द करण्यात आला. तपासणीत प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्री, शेड्यूल-एच व एच-१ औषधांच्या नोंदीतील त्रुटी, कोल्ड-चेन नियमांचे उल्लंघन, आवश्यक नोंदींचा अभाव आणि सूचना फलक न लावल्याचे प्रकारही आढळले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT