Fake Currency seized Virar
खानिवडे: वसई पूर्वेतील मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५०० रुपये किमतीच्या एकुण १ कोटी रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका कारचालकाला वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे.
वसई पूर्वेतील राष्ट्रीय महामार्गावरील विरार फाटा येथे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही धडक कारवाई केली. संशयित कारचालक याच भागातील रहिवासी असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जात असताना सोमवारी (दि. १०) रात्री विरार फाटा येथे गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.
गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार, गुन्हे शाखा २ च्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईतील मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू असून ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला आज वसई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुंबई: राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांलगतचे बेकायदेशीर ढाबे, उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत हटविण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शासनाने याबाबत कडक पाऊल उचलले आहे. या आदेशाची तत्काळ काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने १० ऑगस्ट रोजी सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींना परिपत्रक जारी केले आहे.
राजस्थानमधील फलोदी अपघातप्रकरणी दाखल ‘सु-मोटो' जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने या आदेशाची गंभीर दखल घेत मुख्य सचिवांच्या बैठकीनंतर हे परिपत्रक निर्गमित केले आहे.