BMC  Pudhari Photo
मुंबई

BMC News : सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांवर वाढीव निधीचा वर्षाव

सभागृहात अर्थसंकल्पाला मंजूरी मिळाल्यानंतर आता सत्ताधारी पक्षांतील नगरसेवकांंना विकास निधी देण्याची प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांसह सर्वपक्षीय गटनेते यांच्यावर कोट्यवधीच्या निधीची खैरात करण्यात आली आहे. सभागृहात अर्थसंकल्पाला मंजूरी मिळाल्यानंतर आता सत्ताधारी पक्षांतील नगरसेवकांंना विकास निधी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपचे पालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांना 15 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर मनसे, ठाकरे सेना पक्ष फिरून आलेल्या भाजपा नगरसेविका अर्चना भालेराव यांना 10 कोटींचा वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या राखी जाधव यांनाही सात कोटी रुपये अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

पालिकेच्या सन 2026 -27 च्या अर्थसंकल्पावर 188 नगरसेवकांनी 94 तास चर्चा केली. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वपक्षीय गटनेते व नगरसेवकांनी वाढीव देण्यात आला. सभागृह नेते गणेश खणकर यांना 15 कोटी वाढीव निधी तर अर्चना भालेराव यांना 10 कोटी, तर राखी जाधव यांना सात कोटी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यावर चर्चेदरम्यान भर दिला.

अर्थसंकल्पात स्थायी समितीसाठी 800 कोटींचा वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात आला, तर स्थायी समितीच्या विकास निधीतून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची 25 लाखांवर बोळवण केली होती. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना 2 कोटी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच भाजप महायुतीतील प्रभाग समिती अध्यक्षांना अतिरिक्त जादा निधी उपलब्ध केल्याने सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.

अखेर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी अंधेरीतील नगरसेवकांच्या निधीत कपात करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षांना पत्र लिहून केली होती. साटम यांच्या पत्राची दखल घेत अंधेरीतील सहा प्रभागातील नगरसेवकांच्या निधीत कपात करण्यात आली. मात्र अर्थसंकल्पीय चर्चेत नगरसेवकांनी वाढीव निधी मिळावा ही मागणी केली आणि आता त्यांना वाढीव निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

पक्षांना मिळालेला निधी

  • भाजप - गणेश खणकर आता 15 कोटी वाढीव निधी, रोहन राठोड आधी 9 कोटी, वाढीव 2 कोटी, हेतल गाला आधी 3 कोटी, वाढीव 1 कोटी, नील सोमय्या आधी 2.50 कोटी, वाढीव 2 कोटी, अर्चना भालेराव आधी 2.50 कोटी, वाढीव 10 कोटी, राखी जाधव आधी 3 कोटी, वाढीव 10 कोटी

  • शिंदे गट - गटनेते अमय घोले आधी 10 कोटी, वाढीव 1 कोटी, संध्या दोशी आधी 10 कोटी, आता 1 कोटी 90 लाख वाढीव

  • मनसे-यशवंत किल्लेदार आधी 2 कोटी, वाढीव 1 कोटी

  • ठाकरे सेना- किशोरी पेडणेकर आधी 2 कोटी, वाढीव 1 कोटी

प्रभागनिहाय वाढीव निधी

  • रेखा यादव - आर/उत्तर-2.50 लाख आधी - आता 1 कोटींची वाढ

  • तेजस्वी घोसाळकर आर/उत्तर 2.50 लाख - 2 कोटी वाढीव निधी

  • प्रकाश दरेकर - आर/उत्तर 5 कोटी 2 कोटींची वाढ

  • मंगेश पांगारे - आर/उत्तर 2.50 लाख 1 कोटी वाढ

  • संजय घाडी - आर/उत्तर 10 कोटी वाढीव 2 कोटी

  • दीक्षा कारकर - आर/उत्तर 3 कोटी वाढीव 2 कोटी

  • योगिता पाटील आर/उत्तर 2.50 लाख - 2 कोटी वाढीव निधी

  • शिवानंद शेट्टी - आर/मध्य 2.50 लाख 2 कोटी वाढीव निधी

  • जितेंद्र पटेल आर/मध्य 2.50 लाख - 2 कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT