प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अभिषेक बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  (Pudhari Photo)
मुंबई

Kolhapur BJP | माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे यांच्यासह माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Kolhapur Political News | प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

Abhishek Bondre joins BJP

मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक व सहकार क्षेत्रातील युवा नेतृत्व अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे यांच्यासह अनेक नेते आणि माजी नगरसेवकांनी आज ( दि. १५) भाजप पक्षात अधिकृत प्रवेश केला. अभिषेक बोंद्रे हे माजी कृषी राज्यमंत्री दिवंगत श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू आणि गोकुळचे संचालक दिवंगत चंद्रकांत बोंद्रे यांचे सुपुत्र होत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे, माजी नगरसेवक दिलीप पोवार, माजी नगरसेविका सरस्वती पोवार, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, आणि जनसुराज्य शक्ती पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते संताजी घोरपडे यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुधीर गाडगीळ आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली, दूरदृष्टी आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने काम करण्याची पद्धत प्रेरणादायी आहे. त्यांच्या विकासाभिमुख धोरणामुळे महाराष्ट्राने प्रगतीचा नवा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया बोंद्रे यांनी यावेळी दिली.

आजपर्यंत करवीर विधानसभा मतदारसंघात भाजपला अधिकृत व ठोस असा पर्याय नव्हता. मात्र, अभिषेक बोंद्रे यांच्या पक्षप्रवेशामुळे आता करवीरमध्ये भाजपला एक सक्षम व विश्वासार्ह नेतृत्व लाभले आहे,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT