मुंबई : मध्य रेल्वेवरील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलाचे पाडकाम आता गतीमान झाले आहे. या पुलाचा रेल्वे रुळांवरून जाणारा भाग हटवण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तीन ते चार मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या ब्रिटीशकाली पुलासाठी वापरलेले लोखंडी तुळई, पोलादी सांगाडा आणि काँक्रीटचा भाग हटवण्यासाठी मोठ्या क्रेन, गॅस कटिंग मशीन यांसारख्या यंत्रणांचा वापर होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या ट्रॅकवरुन जाणाऱ्या ट्रेनना पूर्णपणे थांबवणे गरजेचे आहे. याठिकणी सुरक्षेसाठी तांत्रिक कर्मचारी तैनात राहणार आहेत तरीही. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच हा मेगाब्लॉक घेणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुख्यता रात्री व रविवारीच घेणार मेगाब्लॉक
प्रवाशांच्या सोयीसाठी मेगाब्लॉक रात्रकालीन अथवा रविवारी घेण्यात येणार आहेत. यामुळे नियमित प्रवासात अडथळा कमी होईल. त्याचबरोबर, गर्दी लक्षात घेता रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या नवीन पुलाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.
एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे