Elphinstone Road Bridge : मुंबईत एल्फिन्स्टन पूल आजपासून बंद, स्थानिक आक्रमक; आंदोलकांनी गाड्या अडवल्या

मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. तो वांद्रे- वरळी सागरी सेतूला थेट अटल सेतूशी शिवडी येथे जोडण्यात येणार आहे.
Elphinstone Road Bridge |
Elphinstone Road Bridge : मुंबईत एल्फिन्स्टन पूल आजपासून बंद, स्थानिक आक्रमक; आंदोलकांनी गाड्या अडवल्याPudhari Photo
Published on
Updated on

Elphinstone Road Bridge in Mumbai closed

मुंबई : परळ व प्रभादेवी परिसरास जोडणारा महत्त्वाचा आणि 125 वर्ष जूना असलेला ब्रिटीशकालीन एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी (दि. 25) रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वरळी-शिवडी एलिव्हेटेड मार्गाच्या कामासाठी एल्फिस्टन रेल्वे पूल पाडण्यात येणार आहे. एल्फिस्टन पूल आज, शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल पुढची दोन वर्ष वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक रहिवासी हे रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत हा पूल तोडून नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून तो वांद्रे- वरळी सागरी सेतूला थेट अटल सेतूशी शिवडी येथे जोडण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी 8 एप्रिलला अधिसूचना काढून वाहतुकीसाठी एल्फिन्स्टन पूल बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

नवी पूल बांधण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. एल्फिन्स्टन ब्रिजवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली असून ही वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. यामध्ये एल्फिन्स्टन पुलाचा वापर करून पूर्व पश्चिम दिशांना जाणाऱ्या वाहनांना पर्यायी वाहतूक मार्गांची सोय करण्यात आली आहे. तसेच काही मार्ग एकेरी करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहे.

पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी :

  • दादर पूर्वेकडून पश्चिमकडे व दादर मार्केटकडे जाणारे वाहनचालक हे टिळक पुलाचा वापर करतील.

  • परळ पूर्वेकडून प्रभादेवी व लोअर परळ जाणारे वाहनचालक हे करी रोड पुलाचा वापर करतील (सकाळी ७ वा. ते दुपारी ३ वा. पर्यंत).

  • परळ, भायखळा पूर्वेकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सि-लिंकच्या दिशेने जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी पुलाचा वापर करतील.

करी रोड रेल्वे ब्रिजवरील वाहतूक नियोजन

  • कॉम्रेड कृष्णा देसाई चौककडून (भारत माता जंक्शन) शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक एक दिशा मार्ग : सकाळी ७ ते दुपारी ३

  • शिंगटे मास्तर चौककडून कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे (भारत माता जंक्शन) वाहतूक एक दिशा मार्ग : दुपारी ३ ते रात्री ११

पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी :

  • दादर पश्चिमेकडून दादर पूर्वकडे जाणारे वाहनचालक हे टिळक पुलाचा वापर करतील.

  • प्रभादेवी व लोअर परळ पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय व के. ई. एम. रुग्णालय येथे जाणारे वाहनचालक हे करी रोड पुलाचा वापर करतील. (दुपारी ३ वा. ते रात्रौ ११ वा. पर्यंत).

  • कोस्टल रोड व सी-लिंकने व प्रभादेवी, वरळीकडून परळ, भायखळा पूर्वेकडे जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी पुलाचा वापर करतील

वाहतुकीस दुहेरी मार्गिका चालू

सेनापती बापट मार्ग :

वडाचा नाका ते फितवाला जंक्शनपर्यंत दुहेरी मार्ग चालू राहील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news