Eknath Shinde On Aditya Thackeray pudhari
मुंबई

Eknath Shinde On Aditya Thackeray: वरळीचा 'सचिन' आदित्य ठाकरेंची दांडी गुल करणार का...? शिंदेंनी स्पष्ट शब्दातच सांगितलं

Anirudha Sankpal

Eknath Shinde On Aditya Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आदित्य ठाकरे यांचे एकेकाळचे राईट हँड असलेल्या सचिन अहिर यांनाच फोडून आपल्या गोटात सामील केलं. विशेष म्हणजे अहिर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उपसभापती पदाच्या निवडणुकीची उमेदवारी देऊन शिंदेंनी मोठी राजकीय खेळी केली आहे.

३० जून ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्याच दिवशी त्यांनी शिवसेना उबाठा गटाचा एक मोठा आणि ठाकरेंचा विश्वासू कार्यकर्ता आपल्या पक्षात आणला. यानंतर आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात शिंदे गट सचिन अहिर यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार देणार अशी चर्चा सुरू झाली.

दरम्यान, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आम्ही एका अष्टपैलू अन् सचिन तेंडुलकर सारखी बॅटिंग करणाऱ्या कार्यकर्त्यांला आमच्याकडे आणलं असल्याचं सांगत सचिन अहिर यांचे ठाकरे गटातील महत्वच अधोरेखित केलं.

या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना तुम्ही सचिन अहिर यांना वरळी मतदार संघातून उभं करणार का असा प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अजून त्या गोष्टीला तीन वर्षे बाकी आहेत. ते आताही आमदार आहेत आणि ते आता विधान परिषद उपाध्यक्ष देखील होणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी, 'आम्ही कोणालाही बघून किंवा कोणताही मतदार संघ असा डोळ्यासमोर ठेवून कोणतीही काम करत नाही निर्णय घेत नाही. त्यामुळं जसजशी वेळ येईल तसतसा निर्णय घेतला जाईल.

एकनाथ शिंदे यांनी जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा... शिव्यांची आता शिव्यांची सेना ही आताच सहा मतदार संघात जाऊन आली त्यांचे स्वागत आमच्या सचिन अहिर यांनी चांगल्या प्रकारे केलं. आता त्यांनी अत्मपरिक्षण त्यानीही करावे. असा खोचक टोला देखील लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT