पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना आज (दि.३) ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना अशक्तपणा जाणवत होता. दरम्यान, माझी प्रकृती उत्तम असून वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात आलो होतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयातून बाहेर पडताना सांगितले.
दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना तातडीने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिला होता.
राज्यात सत्तास्थापनेसाठी (Maharashtra government formation) घडामोडींना वेग आला आहे. याच दरम्यान, शिंदे (Eknath Shinde) यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या सर्वांच्या भेटी रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी अचानक हेलिकॉप्टरने महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब गावी दाखल झाले होते. एकीकडे राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या असतानाही त्यांनी गावी येऊन विश्रांती घेण्याचे पसंद केल्याने तर्कवितर्क लढवले जात होते. कुणाशीही संवाद न साधता ते एकांतवासात गेल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नाराजीच्या चर्चेला आणखी उधाण आले होते.
त्यानंतर शिंदे रविवारी दुपारी हेलिकॉप्टरने ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी भेटीगाठी टाळल्या होत्या. त्यांना अशक्तपण जाणवत होता. त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत होत्या. त्यांची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून काही चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.