

सातारा : पुढारी वृत्तसेवा
मी मुख्यमंत्री नाही तर कॉमन मॅन आहे. जनतेने महायुतीला भरघोस मते देत आमच्यावर विश्वास दाखवला. आता आम्ही जनतेला काय देणार हे महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असून ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे मत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या दरे गावात होते. त्यांची प्रकृती बिघडल्याच्याही बातम्या आल्या होत्या. दरम्यान आज त्यांनी ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं. आता ते हेलिकॉप्टरने ठाण्याला निघणार आहेत. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्या सरकारने कधीही न राबवलेल्या कल्याणकारी योजना राबवल्या. लाडकी बहीण, भाउ, शेतकरी यांच्यासाठी काम केलं. एकुणच अडीच वर्षात महायुतीन चांगल काम केल्याच म्हणत विरोधकांना काही काम नसल्यान इव्हीएमवर बोलतात अशी टीका त्यांनी केली.