Eknath Shinde File Photo
मुंबई

New Shivsena Bhavan: ऑपरेशन टायगरनंतर आता ‘स्वतंत्र’ शिवसेना भवन; शिंदे सेनेकडून दादर परिसरातच जागेचा शोध

मातोश्रीजवळील बीकेसीतील जागेला नापसंती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ऑपरेशन टायगर यशस्वी करून उबाठा गटात दोन वेळा फूट पाडणाऱ्या शिवसेनेचा विस्तार दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राजधानी मुंबईत नेते, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी हक्काचे आणि सुसज्ज मध्यवर्ती कार्यालय असावे म्हणून उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र शिवसेना भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुषंगाने वांद्रे-कुर्ला संकुल आणि दादरमध्ये जागांची चाचपणी करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरमध्ये उभारलेल्या सेनाभवनाच्या धर्तीवर ही वास्तू असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नव्या ‘सेनाभवना'साठी मुंबईत दोन जागांची प्राथमिक पाहणी झाली आहे. यातील पहिली जागा वांद्रे-कुर्ला संकुलात असून ती उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री' निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत वेगळे असल्याचे समजते.

शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेला पक्ष आहे. त्यामुळे कॉर्पोरेट कार्यालयांनी व्यापलेल्या बीकेसीमधून पक्षाचे मुख्य कार्यालय चालवणे योग्य ठरणार नाही.

त्याऐवजी शिवसेनेच्या परंपरेशी, इतिहासाशी आणि चळवळीशी जोडलेल्या मराठमोळ्या दादर परिसरातच हे भव्य मुख्यालय असायला हवे, अशी भूमिका आहे. त्यामुळे दादरमधील जागेला अधिक पसंती आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून ही चर्चा असली तरी शिवसेना भवनासाठी योग्य जागा अजूनही मिळाली नसल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT