ED Raids  pudhari
मुंबई

ED raids: मुंबईसह देशभरात ईडीची धडक कारवाई; बेकायदा ‘Parimatch’ बेटिंग रॅकेटप्रकरणी १२ ठिकाणी छापेमारी

Illegal Parimatch betting : या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे जाळे उलगडण्यासाठी ईडीकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित व्यक्ती आणि संस्थांच्या भूमिकेची कसून चौकशी केली जात आहे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बेकायदा ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म ‘Parimatch’ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देशभरात मोठी कारवाई करत एकाचवेळी १२ ठिकाणी छापेमारी केली. २ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई ईडीने PMLA 2002 च्या कलम 17 अंतर्गत ही झाडाझडती केली.

या कारवाईत महाराष्ट्रातील ५, राजस्थानातील २, गुजरातमधील १ आणि दिल्ली-एनसीआरमधील ४ ठिकाणांचा समावेश आहे. बेकायदा बेटिंग व्यवहारांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारांचा तपास ईडीकडून सुरू असून, अनेक पेमेंट कंपन्या आणि आर्थिक साखळीतील घटक ईडीच्या रडारवर आले आहेत.

तपासादरम्यान पेमेंट कंपन्या, चार्टर्ड अकाउंटंट (CA), कंपनी सेक्रेटरी आणि पेमेंट गेटवे यांच्याकडे झाडाझडती करण्यात आली. Parimatch साठी Pay-in आणि Pay-out व्यवहार हाताळणाऱ्या पेमेंट गेटवेंवरही ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे.

प्राथमिक तपासात बेटिंगमधून मिळालेला पैसा Cash Management System एजंटच्या माध्यमातून रोखीत रूपांतरित केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच बेकायदेशीर रेमिटन्स आणि बनावट ODI (Overseas Direct Investment) गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा परदेशात वळवण्यात आल्याचा आरोपही तपास यंत्रणांनी केला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे जाळे उलगडण्यासाठी ईडीकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित व्यक्ती आणि संस्थांच्या भूमिकेची कसून चौकशी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT