ED Raids In Mumbai pudhari news
मुंबई

ED Raids In Mumbai : मुंबईत ED ची मोठी कारवाई.... ८ ठिकाणी केली छापेमारी

Anirudha Sankpal

ED Raids In Mumbai :

मुंबईत सक्तवसुली संचलनालयनानं आज (दि. ८ ऑक्टोबर) तब्बल ८ ठिकाणी छापेमारी केली. मुंबईत ही मोठी कारवाई मनी लाँडरिंग प्रकरणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोठ्या कारवाईचा संबंध हा ड्रग तस्करी नेटवर्कशी संबंधित आहे.

सक्तवसुली संचलनालय मुंबई झोनल कार्यालयानं पीएमएलए २००२ च्या कायद्याअंतर्गत ही कारवाई केली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'ही कारवाई फैसल जावेद शेख आणि त्याची सहकारी अल्फिया फैसल शेख यांनी ड्रग्जच्या अवैध नेटवर्कद्वारे जमवलेल्या संपत्ती जप्त करणे आणि मनी लाँडरिंगचा माग काढण्यासाठी करण्यात आली आहे.'

ईडीच्या प्राथमिक चौकशीत फैसल जावेद शेख हा सलीम डोलाकडून एमडी ड्रग खरेदी करत होता. सलीम डोला हा ड्रग तस्कर असून त्याला मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. डोला हा अनेक एजन्सीजच्या रडावर आहे. तो अंमली पदार्थाच्या तस्करीतला आणि त्याबाबतच्या मोठ्या आर्थिक घडामोडींमधला एक महत्वाचा सिंडेकेट आहे. एनसीबीने त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे.

ईडीची आजची कारवाई ही ड्रग संदर्भातील मोठ्या मनी लाँडरिंगवरील मोठी कारवाई म्हणून गणली जात आहे. या कारवाईद्वारे मुंबई आणि संबंधित भागात ड्रग्जच सिंडिकेट चालवणाऱ्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवारी ईडीनं दिल्ली, नोएडा, गरूग्राम, हरियाणा आणि मुंबई येथील १५ ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. या ठिकाणांवरून ड्रग सिंडिकेटला तांत्रिक मदत मिळत होती असा दावा ईडीनं केला आहे.

ईडीनं सांगितलं की आरोपी हे रोहिणी, पश्चिम विहार आणि रजोरी गार्डन या दिल्लीतील ठिकाणांवरून अनेक फेक कॉल सेंटर चालवत होता. या सेंटरवरून विदेशी नागरिकांना प्रसिद्ध जागतिक फर्मचे प्रतिनिधी असल्याचं भासवून टार्गेट केलं जातं होतं.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT