Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; वाहने पेटली, दोन जण गंभीर जखमी

Samruddhi Highway Accident
Samruddhi Highway AccidentPudhari Photo
Published on
Updated on

Samruddhi Highway Accident :

वैजापूर:

समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील चैनल क्रमांक ४६९ जवळ साडे नऊ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि धान्य काढणाऱ्या हार्वेस्टर यांच्यात जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांनी काही वेळातच पेट घेतला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Samruddhi Highway Accident
Samruddhi Highway | समृद्धी महामार्गावर खिळे, लूटमार झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल : नेमकं सत्य काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावरून जात असलेला ट्रक हा हार्वेस्टरवर ला ओव्हरटेक करत असताना नियंत्रण सुटून आदळला. धडक इतकी जबरदस्त होती की काही सेकंदांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. घटनास्थळी आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने वाहतुकीत गोंधळ उडाला, वैजापूर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून. ते दाखल होताच आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

Samruddhi Highway Accident
Purna Flood | पुरात जेसीबीवर अडकलेले समृद्धी महामार्गाच्या ४ मजुरांची आठ तासांनंतर सुखरूप सुटका

अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news