Salim Dola ED Action Pudhari
मुंबई

Salim Dola ED Action: सलीम डोलाच्या मालमत्तेवर महाराष्ट्र, गुजरातमध्ये ‌‘ईडी‌’ छापे

सलीम डोलाने महाराष्ट्रासह गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी घेतल्याचा संशय आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ड्रग्जचा व्यवहार पाहणाऱ्या सलीम डोलाच्या बेहिशोबी मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया ईडीने सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात वीसहून विविध ठिकाणी ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा तपशील प्राप्त झाला नाही. मात्र सलीम डोलाने महाराष्ट्रासह गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी घेतल्याचा संशय आहे.

गेल्या महिन्यात विदेशातून दाऊदसाठी ड्रग्जसह आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या सलीम डोलाला तुर्की येथून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्याच्यावर मनी लांॅड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल असून त्याचा तपास ईडीकडून सुरु आहे.

त्याच्या चौकशीत सलीमने मुंबईसह महाराष्ट्र, गुजरातच्या सुरत, राजकोट, भरुचच्या अंकलेश्वर येथे मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी खरेदी केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रासह गुजरातच्या 20 हून अधिक ठिकाणी अचानक छापे टाकले होते. ही प्रॉपर्टी त्याने ड्रग्जच्या पैशांतून खरेदी केली होती.

सलीम 25 वर्षांपासून विदेशात वास्तव्यास होता. तिथे तो हमजा आणि अब्दुल या नावाने परिचित होता. तुर्कीचे नागरिकत्व मिळावे यासाठी त्याने प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने तिथे मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी खरेदी केल्याचे बोलले जाते. यापूर्वी 2025 साली त्याचा मुलगा ताहिल सलीम डोला आणि इतर सहकाऱ्यांचे संयुक्त अरब अमिराती येथून प्रत्यार्पण करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT