नवी मुंबई ःखास दसर्यासाठी शेतात फुलवलेला झेंडू फुलोर्यास असतानाच सततच्या पावसाने शेतातच कुजला आहे. त्यामुळे एक दिवसावर आलेल्या दसरा सणासाठी मुंबईत झेंडूचा तुटवडा जाणवणार असून झेंडू भाव खाणार आहे. मंगळवारी घाऊक बाजारात 160 ते 200 रुपये किलो दराने झेंडू विकला गेला. दसर्याला 300 रुपये किलोपर्यंत झेंडूचे दर जातील, असा अंदाज किरकोळ व्यापार्यांनी वर्तवला आहे.
दसरा सणासाठी झेंडूला मागणी वाढली आहे. मात्र पुरवठा कमी असल्याने झेंडूच्या फुलांचे दर वाढले आहेत. गणेशोत्सवात 80 ते 100 रुपये किलोने विकली जाणारी झेंडूची फुले नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून 100 ते 120 रुपये दर होते.
सोमवारपासून दर वाढत 160 ते 200 रुपयांवर गेले असल्याचे फूल विक्रेत्या शीतल भोसले-पिसाळ यांनी सांगितले.अतिवृष्टीने सर्व फुलझाडे खराब झाली असून ऐन सणात फुले खराब झाल्याने शेतकरी हताश असल्याचे मुंबईतील विके्रत्यांचे म्हणणे आहे.
फुलांचे दर (किलो)
झेंडू - 160 ते 200 रुपये
गुलाब (सुटा) - 280 रुपये
शेवंती (पिवळी) -240 रुपये
अष्टर (गुलाबी) - 240 रुपये
झेंडूचे पीक थंड हवामानात चांगले येते. मागील 20 ते 25 दिवसांत जास्त पावसामुळे किंवा प्रतिकूल हवामानामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम झाल्याने उत्पादन कमी झाले आहे. ज्यामुळे फुलांच्या किमती वाढल्या आहेत.आशिष तुपकर, फूल विक्रेते