Gold pudhari photo
मुंबई

Dussehra Gold Sale: दसऱ्याला सोन्याची जोरदार खरेदी! राज्यात २ दिवसांत एक हजार कोटींची सोन्याची उलाढाल

मुंबईत ५००, तर देशात २ लाख ६०३ कोटी ८० लाखांची सराफ बाजारात सोन्याची विक्री

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत विजयादशमीचा मुहूर्त साधत महाराष्ट्रात ४५० ते ५०० कोटी तर मुंबईत ५०० कोटीहून अधिक म्हणजे सरासरी १ हजार कोटींची सोन्याची विक्री झाली. देशभरात हीच उलाढाल २ लाख ६०३ कोटी ८० लाखांची असून मुंबईत मंगळवारी दसऱ्याच्या सणाला ३५०

कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीला दिली.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी सोन्याचा दर १ लाख ४९ हजार २५० रुपये होता. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात तोळ्यामागे ४२०० रुपयांची घसरण झाली. सोने प्रतितोळा १ लाख ४५ हजार रुपयांवर आले. दसऱ्याला सोन्याच्या दरात पहिल्यांदाच मोठी घसरण झाल्याचे सराफ व्यावसायिक सांगतात.

या घसरणीमुळे ग्राहकांकडून खरेदीला मोठी गर्दी झाली. राज्यात पुणे,नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबईत सर्वाधिक सोने विक्रीची उलाढाल झाली. राज्यातील उलाढालीचे प्रमाण ५०० कोटी रुपये असावे, असे रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका यांनी पुढारीला सांगितले.

दसरा, दिवाळी, अक्षय्य तृतीया या सणावाराला महाराष्ट्रात सुमारे २५०० कोटींपेक्षा अधिक सोन्याची विक्री होते. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे १५०० ते १८०० कोटींची उलाढाल ही या तीन सणावाराला आवर्जून होते.

दसऱ्याची सोनेरी उलाढाल

  • मुंबई ३५० कोटी

  • पुणे ७० ते ८० कोटी

  • नाशिक ४० ते ५० कोटी

  • नागपूर ४० कोटी

  • जळगाव ४० ते ५० कोटी

  • छत्रपती संभाजीनगर ३० ते ४० कोटी

  • कोल्हापूर ३५ कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT