ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना कारावास pudhari photo
मुंबई

Drug trafficking case Mumbai : ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना कारावास

आरोपी फार्मा कंपनीचा मालक, कर्नाटकात ड्रग्ज बनवून मुंबईत करीत होता विक्री

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ड्रग्ज तस्करीप्रकरणी प्रविण वाघेला आणि रामदास नायक या दोन आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने वीस वर्षांच्या कारवासासह एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 9 जानेवारी 2017 रोजी प्रविण याला घाटकोपर युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चेंबूर येथून अटक करीत त्याच्याकडून दहा किलो दोनशे ग्रॅम वजनाचा दोन कोटी चार लाख रुपयांचे एमडी ड्रग्जसह मोबाईल आणि सात लाख रुपयांची एक कार असा 2 कोटी 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

चौकशीत प्रविण हा एका फार्मा कंपनीचा मालक असून त्याचा कारखाना कर्नाटक येथील हवेरी, हनगल परिसरात असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानंतर या पथकाने तिथे छापा टाकून रामदास पांडुरंग नायक या अन्य एका आरोपीस अटक केली.

या कारवाईत पोलिसांनी एक हजार लिटरचे रासायनिक द्रव्य, 261 किलो ब्रोमिन नावाचे केमिकल, अन्य चौदा लिटर केमिकल, सात किलो केमिकल पावडर असा साडेतीन कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी या कारखान्याला सील केले आहे. तपासात याच कारखान्यात ते एमडी ड्रग्ज बनविले जात होते.

या ड्रग्जची ते दोघेही फिरदोस रज्जाक नाथानी ऊर्फ फिरोज याच्या मदतीने विक्री करत होते. त्यामुळे या गुन्ह्यांत नंतर फिरोजला पोलिसांनी अटक केली होती. या तिघांविरुद्ध नंतर विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते.

या गुन्हयांचा तपास द्वितीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भालेकर, पोलीस प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, उपनिरीक्षक चारु चव्हाण यांनी केला तर कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार रंगनाथ घुगे, संदेश मोहिते, महिला पोलीस शिपाई सुदक्षिणा नेहे, दिप्ती दरेकर, तानाजी खारे यांनी न्यायालयीन पाहिले तर सरकारी अभियोक्ता भगवान राजपूत यांनी कोर्टात पोलिसांच्या वतीने बाजू मांडली होती.

  • या खटल्याची सुनावणी पूर्ण होताच न्यायालयाने प्रविण वाघेला आणि रामदास नायक या दोघांना दोषी ठरविले होते. 17 डिसेंबरला न्यायालयाने या दोघांनाही 20 वर्र्षे कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT