Dombivli Lezim World Record Pudhari
मुंबई

Dombivli Lezim World Record: डोंबिवलीत 9,111 महिलांचे सामूहिक लेझीमवादन; जागतिक महिलादिनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

महिला व विद्यार्थिनींच्या सहभागातून इतिहास; सांगलीचा विक्रम मोडत डोंबिवलीच्या नारीशक्तीची जगभर दखल

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागातील 9,111 महिलांसह विद्यार्थिनींनी रविवारी एकत्र येऊन सामूहिक लेझीमवादन केले. गिनिज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या नारी शक्तीने डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.

डोंबिवलीचे आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ‌‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार‌’ आणि ‌‘कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समिती‌’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक

लेझीमवादन उपक्रमात रविवारी ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील विस्तीर्ण पटांगणावर विद्यार्थिनी आणि महिलांनी एकत्र येऊन 9 हजार 111 इतक्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीमवादनाचे वर्ल्ड रेकॉर्ड केले.यापूर्वी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता,अशी माहिती गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT