डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा
डोंबिवली पूर्व येथील टिळक नगर चौकात आनंद शीला या सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेचा गळा दाबून खून केल्याची खळबजनक घटना घडली आहे. विजया बावीस्कर (वय ५८) असे या महिलेचे नाव आहे.
विजया बावीस्कर या घरात एकट्याच राहत होत्या. रात्री घरात घुसून या महिलेचा खून केला असून, सकाळी घरकाम करणारी महिला घरात आली असता झालेला सर्व प्रकर तिच्या निदर्शनास आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याला दिली. या घटनेचा तपास टिळक नगर पोलीस करत आहेत.
हेही वाचलं का?