मुंबई : आंनद व मांगल्यांचा दिवाळी सण चार दिवसांवर आला असून बच्चे कंपनीकडून बाजारात फटाक्यांची मागणी वाढली आहे. मुंबईच्या बाजारात यावर्षी विविध प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आकाशात उडणारा पाच रंगाचा पाऊस, आकर्षक ड्रॅगन तर जमिनीवर एकाचवेळी फिरणारे स्पिनर भुईचक्र हे खास आकर्षण असणार आहे. यासह लहानग्यांसाठी तडतड आवाज करणारे चुटपूट, फुलबाजे तर लवंगी फटाके उपलब्ध आहेत. मुलांना आवडणाऱ्या बुलेट बॉम्बसह 10 हजार रुपयांपर्यंतच्या फटाक्यांच्या माळांनाही मागणी आहे.
फटाक्यांना चांगली मागणी आहे. मात्र, पालकांच्या खिशाला खरेदीमुळे चाट पडत आहे. फटाक्यांच्या दरात सरासरी 10 टक्के वाढ झाली असल्याचे मुंबईतील विक्रेत्यांनी सांगितले. हवेत उडणाऱ्या फटाक्यांमध्ये साधा, ड्रगन व त्रिशुलसह म्युझिकल क्रॅक्स व मोराचा पिसारा असणारा बडा पिकॉक असे फटाके बाजारात आहेत. जमिनीवर एकाचवेळी फिरणारी 10 भुईचक्र, तडतड आवाज करणारे व लहान मुलांना आकर्षित वाटणारे किटकॅट अर्थात चिटपुट फटाक्यांना मोठी मागणी आहे.
साधा, रंगीत व तडतड करणारे असे तीन प्रकार फुलबाजे असून 100 ते 250 रुपये दर आहेत. लहान मुलांसाठी बंदुकांचेही विविध प्रकार उपलब्ध असून 30 ते 650 रुपयांपर्यंतच्या बंदुका आहेत. शंभर नगाची माळ 120 रुपये, 1 हजार नगाची 250 रुपये, दोन हजार नगाची माळ 500 रुपये, तीन हजारांची 700 रुपये व 5 हजारांची 1200 रुपये असे माळांचे दर आहेत. लवंगी फटाक्याचा आजही क्रेझ कायम आहे.
फटाक्यांचे दर
प्लावर पॉट फवारा : 90 ते 450
फुलबाजा : 150 ते 250
लाल फटाके : 60
नागगोळी : 10 (पाकिट)
चिटपुट : 300(10 नग)
झंपर (बेडूक उड्या) : 110
लहान पोपट (कुर्मी कलर) : 30
मोठे पोपट (कुर्मी कलर) : 60 े
डबल बार : 70
साधे भुईचक्र : 150 (25 नग)
मोठी कुंडी : 1400(10 नग)
मोठी मातीची कुंडी : 250 (5 नग)
रॉकेट 250 : (10 नग)
रॉकेट मोठे : 450 ( 10 नग)
दिवाळीत 15 टक्के ग्राहकांची जादा मागणी वाढते. इंधन दरवाढ आणि फटाके तयार करणाऱ्या कामगारांचा कामाचा मोबदला वाढल्याने यावर्षी फटाकेच्या दरात सरासरी 10 टक्के वाढ झाली आहे.विलास शिंदे, विक्रेते, दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी, मुंबई