Devendra Fadnavis  Pudhari
मुंबई

Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा... ५००० रूपये थेट खात्यात होणार जमा, फडणवीसांची घोषणा

याचबरोबर राज्य सरकारने आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

Anirudha Sankpal

Devendra Fadnavis Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यात ५००० रूपये ट्रान्सफर करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी दुष्काळ जाहीर झाला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार असून शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवळी कठिण आहे याची जाणीव ठेवून राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आणि मी मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ५००० रूपये ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारवर ६ ते ७ हजार कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.

अजून ४० तालुके दुष्काळग्रस्त घोषित

याचबरोबर राज्य सरकारने आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता एकूण ३०५ तालुक्यात १२ दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

त्याचवेळी दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रीम मदत म्हणून दिवाळीपुर्वी पाच हजार रूपयांची मदत जमा केली जाणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल.

पहिल्यांदाच दुष्काळ ऑक्टोबर महिन्यातच जाहीर

दुष्काळाच्या निकषानुसार मागील २५ वर्षे साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात दुष्काळ जाहीर करून डिसेंबर महिन्यात मदत देण्याची पद्धत आहे. मात्र, यंदाच्या दुष्काळाची स्थिती लक्षात घेत राज्य सरकातरनं आँक्टोबर महिन्यातच तसा शासन निर्णय जारी करत २६५ तालुक्यात दुष्काळ घोषित केला . आता पुरवणी जीआरच्या माध्यमातुन आणखी ४० तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT