Devendra Fadnavis : "कोणत्या संविधानात लिहिलंय न्यायाधीशांनी यांना भेटावं, ऐकून घ्यावं" : मुख्‍यमंत्री फडणवीस

राहुल गांधींसह इंडिया आघाडीकडून भारतीय संविधानाला नाकारण्याचे काम
Devendra Fadnavis On Rahul Gandhi
मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस.
Published on: 
Updated on: 

Devendra Fadnavis On Rahul Gandhi

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : "लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील नेते म्हणतात, सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू. सरन्यायाधीशांनी आमचं ऐकून घ्यावं अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. मात्र, हे कोणत्या संविधानात लिहिले आहे की न्यायाधीशांनी यांना भेटावं, ऐकून घ्यावं? सर्वोच्च न्यायालयाला कोणाशीही चर्चा करता येत नाही, निवेदन स्वीकारता येत नाही. त्यांचा अधिकार तुम्ही दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्याचा आहे. मात्र, जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे," अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर घणाघात केला.

संविधान हातात घेऊन घटनात्मक संस्थांना बदनाम केले जातेय

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी स्पष्ट सांगतो, काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू असणारे आंदोलन पूर्णपणे संविधानविरोधी आहे. संविधान हातात घेऊन घटनात्मक संस्थांना बदनाम केले जात आहे. निवडणूक आयोग, आरबीआय, सीएजी अशा सर्व संस्था कुचकामी असल्याचे दाखवले जात आहे. लोकांना या संस्थांविरोधात चिथावणी देऊन, 'या संस्था तुम्हाला न्याय देऊ शकत नाहीत', असा नरेटिव्ह प्रस्थापित केला जात आहे."

Devendra Fadnavis On Rahul Gandhi
CJP Delhi Protest : अखेर गृह मंत्रालय नरमले, दिल्‍लीत आंदोलन परवानगी;मात्र जंतर मंतरवरील 'नो एन्‍ट्री' कायम

देशात अतिडावी सत्ता प्रस्थापित करायची आहे

"विरोधी पक्षांना भारताचे संविधान नाकारून या देशात अतिडावी सत्ता प्रस्थापित करायची आहे," असा आरोप करत "भारताच्या संविधानाला नाकारण्याचे सर्वात मोठे काम राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने आज केले आहे," असे ते म्हणाले. "स्वतःला जे संविधानाचे पाठीराखे म्हणवतात, त्यांनीच सांगावे; सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एखाद्या मोर्चाला सामोरे जाणे हे भारतीय संविधानाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे का?" असा सवालही फडणवीसांनी यावेळी केला.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi
CJP Delhi protest : दिल्लीत 'सीजेपी'चे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू; १०० हून अधिक जणांना घेतले ताब्यात

सर्वोच्च न्यायालय कमकुवत करण्याचा प्रयत्न

"सरन्यायाधीशांनी सर्व न्यायाधीशांशी चर्चा करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना सांगितले की, आम्हाला तुमच्याशी भेटता येणार नाही. तुम्ही याचिका दाखल केली तर त्याची सुनावणी आम्ही घेऊ शकू. मात्र, आता सोशल मीडियावर सरन्यायाधीशांविरोधात शिवीगाळ केली जात आहे. एका प्रकारे सर्वोच्च न्यायालय कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा आरोपही फडणवीसांनी केला.

इंदिरा गांधींनीही संविधानात दुरुस्ती करून मूलभूत अधिकार नाकारले होते

"१९७५ मध्ये राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनीही संविधानात दुरुस्ती करून मूलभूत अधिकार नाकारले होते. त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा मार्गही बंद केला होता. आम्ही त्यांच्या विरोधात संघर्ष केला आणि संविधान पुन्हा प्रस्थापित केले होते. आता तुम्ही पुन्हा संविधानाशी खेळ केलात, संविधानाची प्रत दाखवून कितीही आंदोलने उभी केलीत, तरी आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावू देणार नाही," असा पुनरुच्चारही फडणवीसांनी केला.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi
Pakistan politics : पाकिस्‍तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात आणीबाणी जाहीर; इम्रान खान यांच्या पक्षाची सत्ता संपुष्टात!

सातत्याने पराभूत झाल्याने काँग्रेस पक्ष धास्तावलेला

"जंतर-मंतरवर अराजकता असण्याच्या काळात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध पोस्ट मोठ्या संख्येने येत होत्या... तेव्हा संसदीय समितीने काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना बोलावून चौकशी केली. तेव्हा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी मान्य केले की, आम्हाला पोस्ट बूस्ट करण्यासाठी पैसे मिळत होते. तो पैसा परदेशी असू शकतो, असेही त्यांनी मान्य केले. काँग्रेस सातत्याने हरल्यामुळे आणि पुढे जिंकण्याची शक्यता नसल्यामुळे ती धास्तावली आहे," असेही फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news