Dharavi Housing Project (File Photo}
मुंबई

Dharavi Housing Project : 3,518 घरांपैकी फक्त 1,178 घरांचेच होणार धारावीत पुनर्वसन

‌‘डीआरपी परिशिष्ट -2 ‌’ मधील आकडेवारीतून माहिती उघड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) अधिकृत ‌‘डीआरपी अंतिम परिशिष्ट - 2‌’ मधील आकडेवारी प्रथमच हाती आली असून, त्यानुसार एकूण 3,518 घरांपैकी फक्त 1,178 घरे (33%) इन-सिटू म्हणजेच धारावीतच पुनर्वसनासाठी पात्र ठरली आहेत.

शासकीय भाषेत यात फक्त 75 घरे म्हणजेच अंदाजे 2% घरे अपात्र घोषित करण्यात आली असली तरी एकूण 3,518 घरांपैकी 2,099 घरे (57%) गृहनिर्माण लाभांसाठी पात्र ठरली आहेत. याचा अर्थ या कथित पात्र रहिवाशांना धारावीत घर मिळणार नाही. गृहनिर्माण लाभ मात्र मिळतील. याशिवाय 1,078 घरे (30.6%) प्रलंबित असून त्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत किंवा विविध शासकीय संस्थांकडून पडताळणी प्रक्रियेत आहेत. “ही घरे अपात्र नाहीत. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा पुनर्विचार केला जाईल,” असे

डीआरपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंतिम परिशिष्ट - प्रसिद्ध झाल्यानंतरही ही प्रक्रिया संपत नाही. “तक्रारींच्या निवारणासाठी रहिवासी प्रथम अपील अधिकारी यांच्याकडे जाऊ शकतात. समाधान न झाल्यास ते तक्रार निवारण समितीकडे जाऊ शकतात. ही समिती सर्वेक्षण प्रक्रियेत सहभागी नसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

डीआरपी अंतिम परिशिष्ट

  • 9 डिसेंबर 2025 पर्यंतची आकडेवारी

  • एकूण घरसंख्या : 3,518

  • थेट धारावीत इन-सिटू पुनर्वसन पात्र : 1,178 (33%)

  • फक्त गृहनिर्माण लाभांसाठी पात्र : 2,009 (57%)

  • प्रलंबित/कागदपत्रांची पडताळणी सुरू : 1,078 (30.6%)

  • सार्वजनिक सुविधा/उपयोगी संरचना : 330 (9.38%)

  • जाहीर अपात्र : 75 घरे (सुमारे 2%)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT