धारावी : १५ दिवसांपासून तोडकाम करण्यात आलेला रेल्वे पादचारी पूल. pudhari photo
मुंबई

Mumbai News : माटुंगा लेबर कॅम्पमधील पादचारी पुलाचे काम रखडले; नागरिक त्रस्त

पूल तोडून जवळपास १५ दिवस उलटले असतानाही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

धारावी : माटुंगा लेबर कॅम्प संजय गांधी नगर भाऊदाजी रोड येथील रेल्वे पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रखडल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. हा पूल तोडून जवळपास १५ दिवस उलटले असतानाही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभागामार्फत या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र पूल पाडल्यानंतर बांधकाम सुरू न झाल्याने माटुंगा लेबर कॅम्प, संजय गांधी नगर आणि धारावी परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि कामगारांना दैनंदिन प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश भालेराव यांनी पालिकेच्या जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करून पुलाचे रखडलेले बांधकाम तातडीने सुरू करून युद्धपातळीवर पूर्ण करावे. तसेच काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांसाठी सुरक्षित पर्यायी पादचारी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT