Fadnavis Uddhav Thackeray pudhari
मुंबई

Fadnavis Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे भेटीच्या बातम्या बिनबुडाच्या... फडणवीस अफवा पसरवणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देणार

Anirudha Sankpal

Devendra Fadnavis Uddhav Thackeray meeting news: मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचे मनोमिलन होत असल्याच्या राजकीय चर्चांना देखील ऊत आला होता. मात्र खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणतीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

फडणवीस यांनी सांगितलं की, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णपणे निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहेत. ज्या समाजमाध्यमांवरून अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांनाही कायदेशीर नोटीस देऊन कारवाई केली जाईल.'

नुकतेच एका माध्यमात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात रात्री उशीरा चर्चा झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मध्यरात्री गेले होते असा दावा करण्यात आला होता. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे भाजप नेते मोहित कांभोज यांच्या घरी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. मोहित कांभोज हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळं या भेटीमागे काही राजकारण दडलं आहे का अशी चर्चा त्यावेळी देखील झाली होती.

नुकतेच मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी लव्ह जिहादचे लावून धरलेले प्रकरण पाहता या राजकीय चर्चांना चांगलीच उकळी फुटली होती. मात्र आता भाजपने अधिकृरित्या या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच कायदेशीर कारवाईची भाषा देखील केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT