Maharashtra Politics News (Pudhari Photo)
मुंबई

Maharashtra Politics News| उद्धव ठाकरेंची भेट घेतलीच नाही: मुख्यमंत्री

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एकांतात भेट झाल्याचा दावा हँडल्सवर करण्यात आला होता. मात्र हा दावा खोटारडा असल्याचे फडणवीस म्हणाले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: उद्धव ठाकरे यांना मला भेटायचे असेल किंवा आमची भेट व्हायची असेल, तर ती लपूनछपून करण्याची आवश्यकता नाही. अशी भेट होऊ शकते, असे सांगत उद्धव ठाकरे आणि आपली भेट झाली नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एकांतात भेट झाल्याचा दावा हँडल्सवर करण्यात आला होता. मात्र हा दावा खोटारडा असल्याचे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि माझ्यात असे कोणतेच विषय नाहीत की जे आता लपवायची आवश्यकता आहे. काही लोक जाणीवपूर्वक, चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देत आहेत. या हँडल्सवर नोटीस बजावली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनाही उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहीती नसल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT