CM Devendra Fadnavis pudhari photo
मुंबई

Manoj Jarange Maratha Reservation| जरांगेंच्या आंदोलनावर कायद्याच्या चौकटीत मार्ग काढणार: फडणवीस

मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनावर कायद्याच्या चौकटीत मार्ग काढण्याची सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. संविधान व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मागण्यांवर चर्चा होणार.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर कायद्याच्या चौकटीत मार्ग काढण्यात येईल. ज्या मागण्या कायदेशीर संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या आहेत, त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, जे काही आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी आहेत. ते चर्चा करत आहेत. यापूर्वीही आपण मार्ग काढला आहे. यापुढेही काढणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पहिल्या दिवसापासून अत्यंत संवेदनशीलपणे प्रयत्न करत आहेत.

मनोज जरांगे यांचे जे आंदोलन सुरू आहे, त्यावर आमची चर्चेची दारे खुली आहेत. ज्या मागण्या कायदेशीर, संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या नसतील अशा सगळ्या मागण्यांवर आमची चर्चा करण्याची आणि मार्ग काढण्याची तयारी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT