Devendra Fadnavis Pudhari
मुंबई

Devendra Fadnavis: अचूक मतदार यादीसाठी ‘एसआयआर’ महत्त्वाची; मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका

‘एक नागरिक, एक मत’ तत्त्वासाठी अद्ययावत मतदार यादी आवश्यक; मृत आणि दुबार नोंदी ओळखून दुरुस्ती करण्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विरोधी पक्षांनी गर्जना मोर्चाच्या निमित्ताने एसआयआर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचूक मतदार यादीसाठी ‘एसआयआर’ महत्त्वाचे असल्याची पोस्ट केली आहे.

‘एक नागरिक, एक मत’ या तत्त्वाला बळ देण्यासाठी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी अत्यंत महत्त्वाची आहे. 'एसआयआर'च्या माध्यमातून मतदार यादीतील नोंदींचे पुनरीक्षण करून निवडणूक प्रक्रियेत अधिक अचूकता आणि विश्वासार्हता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे त्यांनी नमूद केले.

मतदार यादीतील मृत व्यक्तींच्या नोंदी ओळखून त्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. दुबार नोंदी ओळखून मतदार यादीतील पुनरावृत्ती दूर करण्याचे काम करण्यात आल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 'एसआयआर' प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होऊन आपली लोकशाही अधिक सक्षम करूया, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT