Devendra Fadanvis Pudhari
मुंबई

Devendra Fadnavis NCP merger statement- आमच्याशिवाय राष्ट्रवादींचे एकत्रीकरण नाही : फडणवीस

आमच्याशिवाय राष्ट्रवादींचे एकत्रीकरण नाही : फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण आमच्याशिवाय होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत बोलताना, नेमके काय सुरू आहे हे खासदार शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच सांगू शकतील. या दोन्ही नेत्यांनी दिलेली माहितीच ग्राह्य धरली पाहिजे. इतर नेते याबाबत काय बोलतात, त्याला काहीही अर्थ नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासह गोकुळ दूध संघाची निवडणूक, दुष्काळमुक्त महाराष्ट्राची योजना, समान नागरी कायदा, दिशा सालियन मृत्यू प्रकरण, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आणि महायुती सरकारच्या कामकाजावर भाष्य केले.

राहुल गांधींमुळे गोकुळमध्ये राजकारण कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादंगाबाबत फडणवीस म्हणाले, मी कोणत्याही व्यक्तीच्या नव्हे, तर संस्थेच्या बाजूने उभे राहिलो. गोकुळमध्ये एका गटाचे १३, तर दुसऱ्या गटाचे १२ संचालक असल्याने निर्माण झालेली तांत्रिक कोंडी सोडविण्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा केली. सरकारला या संस्थेवर ताबा मिळवायचा असता, तर तो कधीच मिळविता आला असता. मात्र, तसा कोणताही प्रयत्न केलेला नाही. गोकुळसारख्या संस्थेच्या निवडणुकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करून राजकारण आणले. त्यामुळेच या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT