Devendra Fadnavis budget speech pudhari
मुंबई

Devendra Fadnavis budget speech: दादा घालायचे तेच जॅकेट.... मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्प सादर करताना दादांना अनोखी आदरांजली

Anirudha Sankpal

Devendra Fadnavis budget speech: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ६ मार्च) विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पावर दादांची छाप आहेच. मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प आज सभागृहाच्या पटलावर ठेवला. यावेळी त्यांनी अनोख्या पद्धतीनं दादांना आदरांजली वाहिली.

फडणवीसांची अनोखी आदरांजली

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्याही मोठ्या सरकारी कार्यक्रमावेळी किंवा इव्हेंटवेळी गुलाबी रंगाचे जॅकेट घालायचे. त्यांनी हे जॅकेट लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर अन् त्यामुळं महायुतीच्या सरकारला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सातत्यानं घातलं होतं. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दादांचे अपूर्ण काम पूर्ण करताना म्हणजेच राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना दादा घालतात त्याच रंगाचे गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते.

अर्थसंकल्प दादांना समर्पित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यानं आपण यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहोत असं भावून होत सांगितलं. याचबरोबर त्यांनी दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल आणि राज्यात त्यांचे भव्य स्मारक देखील उभारण्यात येईल अशी घोषणा केली. फडणवीसांनी यंदाचा अर्थसंकल्प देखील दादांना समर्पित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना अनेक योजानांची घोषणा केली. तसेच त्यांनी विकसित भारत २०४७ च्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक असणार आहे असं देखील सांगितलं. ते म्हणाले की, आपण १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडं वेगानं जात आहोत. २०४७ पर्यंत आपल्या राज्याची अर्थव्यवस्था ही ५ ट्रिलियन पर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT