Devendra Fadanvis Presence Of Mind :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय प्रसंगावधान सर्वांनाच माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांचं नाव दिग्गज राजकारण्यांमध्ये गणलं जातं. त्यात त्यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयांची देखील महत्वाची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांचे प्रसंगावधान किती उत्तम असतं याची अनेक उदाहरणे राजकीय वर्तुळात आहे. आज देखील त्यांच्या या प्रसांगावधानाची प्रचिती महाराष्ट्रातील लोकांना आली.
देवेंद्र फडणवीस जागतिक बांबू दिनाच्या निमित्त साधून आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी प्रथेप्रमाणं कार्यक्रमस्थळी महाराष्ट्र गीत वाजवण्यात येत होतं. मात्र काही तांत्रिक कारणामुळं हे महाराष्ट्र गीत वाजलं नाही. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसंगावधान दाखवत आपल्या खिशातून मोबईल काढला आणि माईकच्या दिशेने गेले त्यांनी आपल्या मोबाईलमधील महाराष्ट्र गीत माईकवर लावले. यावेळी उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.
मुख्यमंत्र्यांची ही कृती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्वाचा क्षण ठरण्याची शक्यता आहे. यावरून मुख्यमंत्र्यांचे आपल्या राज्यावरील प्रेम अधोरेखित होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देखील कमेंट केली होती. त्यांनी कोणाच्याही वडिलांविषयी असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर त्यांनी पडळकर यांना कडक शब्दात समज दिल्याचं सांगितलं.
दरम्यान, पडळकरांच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्याचा देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना उल्लेख केला. दरम्यान, पडळकर यांनी मात्र जयंत पाटील यांची माफी मागण्यास तुर्तास तरी नकार दिला आहे. त्यामुळं हे प्रकरण वेगळं वळण घेण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.