Bus Pass Validity Extension Demand Pudhari File Photo
मुंबई

Bus Pass Validity Extension Demand: बेस्ट संपाने १० लाख पासधारकांचे नुकसान

बेस्टच्या मासिक बस पासची वैधता तीन दिवस वाढवून द्या; बेस्ट समिती अध्यक्षांची मागणी की आदेश?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या संपामुळे मुंबईतील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. या संपामुळे पासधारक प्रवाशांचा तीन दिवसांचा पास वाया गेला आहे. त्यामुळे त्यांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मासिक बस पासच्या वैधतेत तीन दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. शहरात १० लाख ५६ हजार ६१९ मासिक पासधारक प्रवासी आहेत.

बेस्टने दिवसभरात सुमारे २३ लाख प्रवासी प्रवास करत असतात. १९ जून ते २१ जून अशा तीन दिवसांच्या बेस्ट संपाच्या काळात बेस्टची बससेवा पूर्णतः बंद असल्यामुळे मासिक बसपास धारकांना त्यांच्या बसपास सुविधेचा वापर करता आला नाही.

शहरात १० लाख ५६ हजार ६१९ मासिक पासधारक प्रवासी आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने वेगवेगळ्या तिकीट दरांचे अमर्यादित मासिक पास उपलब्ध करून दिले आहेत. बेस्टच्या दैनंदिन आणि मासिक पासधारकांची संख्या जास्त आहे.

संपामुळे तीन दिवसांच्या बस पासचे पैसे बुडाले आहेत. परिणामी बस पासधारकांना तीन दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी उपक्रमाच्या परिवहन विभागाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT