Highway Vehicle Repair Facility: हायवेवर पंक्चर, वाहनदुरुस्ती सुविधा; 'एनएचएलएमएल'ने प्रादेशिक कार्यालयांना दिले निर्देश

वाहनचालकांना दिलासा
Highway Vehicle Repair Facility
Highway Vehicle Repair FacilityPudhari
Published on
Updated on

मुंबई: राष्ट्रीय महामार्ग (नॅशनल हायवे) आणि एक्सप्रेस वेवर प्रवास करताना वाहन खराब झाल्यास किंवा टायर पंचर झाल्यास आता काळजी करण्याची गरज भासणार नाही. अशा महामार्गांवर असलेल्या ‘वेसाईड एमिनिटीज’ (डब्ल्यूएसए) म्हणजेच रस्त्याकडेच्या सुविधा केंद्रांवर वाहन दुरुस्तीची दुकाने (गॅरेज) आणि पंक्चर काढण्याची सुविधा उपलब्ध असेल.

यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची मालकी असलेली कंपनी 'नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड'ने आपल्या प्रादेशिक कार्यालयांना आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

Highway Vehicle Repair Facility
Mumbai Water Crisis: तानसा तलावही आटला!

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेचा वेगाने विस्तार झाला आहे, परंतु अनेक मार्गांवर वाहन दुरुस्ती आणि पंक्चर काढण्याची पुरेशी व्यवस्था नाही.

अशा परिस्थितीत, प्रवाशांना किरकोळ तांत्रिक बिघाड किंवा टायर पंक्चर झाल्यास मदतीसाठी खूप वाट पाहावी लागते. नवीन व्यवस्था ही कमतरता दूर करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Highway Vehicle Repair Facility
Matheran Ghat Road: माथेरान घाटातील 'एस टर्न' बनला मृत्यूचा सापळा; सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार रामभरोसे

एनएचएलएमएल सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घकालीन लीजवर रस्त्याच्या कडेला आधुनिक सुविधांचे नेटवर्क विकसित करत आहे. या वेसाइड एमिनिटीज केंद्रांवर आधीपासूनच पेट्रोल पंप (इंधन स्टेशन), उपाहारगृहे (हॉटेल्स), शौचालये, पार्किंग आणि विश्रांतीची ठिकाणे यांसारख्या सुविधा विकसित केल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news