Deepak Pawar On Ankita Walawalkar pudhari
मुंबई

Deepak Pawar On Ankita Walawalkar: हे बिग बॉसच्या घरातच कोंडून ठेवायच्या लायकीचे.. अंकिता वालावलकरवर दीपक पवार जाम भडकले

Anirudha Sankpal

Deepak Pawar On Ankita Walawalkar: दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोज जनता पार्टीने देशातील शिक्षण व्यवस्था सुधारावी आणि नीट पेपर फुटीप्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन केलं आहे. प्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे गेल्या २३ ते २४ दिवसांपासून यासाठी आमरण उपोषण करत आहेत. नुकतेच तरूणांनी संसद परिसरात मार्च काढला होता. त्या मार्चला हिंसक वळण लागलं होतं. यानंतर आता या आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

काय म्हणाले दीपक पवार?

मराठी रील्स स्टार आणि बिग बॉस फेम अंकिता वालावलकर हिने देखील याबाबत पोस्ट केली होती. मात्र या पोस्टवरून राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि मराठी भाषेबाबत आग्रही असणाऱ्या डॉक्टर दीपक पवार यांनी टीका केली आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत अंकिताला अत्यंत खोचत टोमणे मारले आहेत.

डॉक्टर दीपक पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'हिने (अंकिता वालावलकर) बारसू प्रकल्पालाही पाठिंबा दिला होता. नटून सजून लाडे लाडे बोलणं हे हिचं स्त्री सक्षमीकरण. असे लोक बिग बॉसच्या घरात कोंडून ठेवण्याच्याच लायकीचे आहेत. हिला म्हणे महाराष्ट्राची काळजी आहे. नको करूस काळजी. तू फक्त रील्स मॉनेटईझ कर. तीच तुझी झेप आहे.'

अंकिताची CJP आंदोलनावर प्रतिक्रिया

अंकिता वालावलकरने दिल्लीतील आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यात ती म्हणते की, 'माझा पाठिंबा हा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांना, गुणवत्तेला आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेल्या प्रामाणिक शिक्षण व्यवस्थेला आहे. माझा पाठिंबा कोणत्याही संघटनेला किंवा राजकीय विचारधारेला नाही. मी CJP ला पाठिंबा देत नाही.'

यावरूनच दीपक पवार यांनी ट्विट करून अंकिता वालावलकरवर टीका केली. मराठी कलाकार मंडळी ही दिल्लीत झालेल्या लाठीचार्जवर बोलू लागली आहेत. अनेक दिग्गज कलाकारांनी याला विरोध करत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करू नये त्यांच्या न्याय मागण्या ऐकून घ्याव्यात अशी भूमिका घेतली आहे.

मात्र काही मराठी कलाकारांनी सरकारची आणि त्यांच्या भूमिकेची पाठराखण केली आहे. जे कलाकार यापूर्वी सत्तेविरूद्ध बोलत नव्हते त्यांनी आता भूमिका घेणं सुरू केलं आहे. त्यामुळे जनमानसातून त्याचे स्वागत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT