Haji Ismail Musafirkhana pudhari photo
मुंबई

BMC : दाऊदची इमारत मशीद नव्‍हे!

महापालिकेचे स्पष्टीकरण : हातोडा तूर्तास रोखला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भेंडी बाजार येथील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना इमारतीच्या पाडकामाला दिलेली स्थगिती हायकोर्टाने ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवली आहे. तसेच, इमारतीची अत्यंत जीर्ण अवस्था पाहता या परिसरात कोणालाही प्रवेश करण्यास किंवा नमाज पढण्यास मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने मनाई केली आहे. ती एक जीर्ण इमारत असून मशीद नाही, असे महापालिकेने न्यायालयात स्पष्ट केले.

पालिकेच्या सी-वॉर्डने १६ नोव्हेंबरला या इमारतीला नोटीस बजावून रहिवाशांना घर रिकामे करण्याचे आदेश दिले होते. ही इमारत धोकादायक असल्याने सी-१ श्रेणीत मोडते, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी बुलडोझर आणि मोठ्या मशिनरीसह पालिकेच्या पथकाने मुसाफिरखान्याचा काही भाग पाडण्यास सुरुवात केली. पाडकाम सुरू असतानाच दोन रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

सुनावणीवेळी महापालिकेने ही इमारत १९३९ मध्ये बांधली गेली. ती एक जीर्ण इमारत असून मशीद नाही, असे स्पष्ट केले, तर याचिकाकर्त्यांनी याचिकेवर निर्णय होईपर्यंत या इमारतीत मशीद असल्याने दररोज किंवा शुक्रवारी नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली.

याची गंभीर दाखल घेत खंडपीठाने या इमारतीच्या पाडकामाला दिलेली स्थगिती ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवली. तसेच इमारतीची अत्यंत जीर्ण अवस्था पाहता या परिसरात कोणालाही प्रवेश करण्यास किंवा नमाज पढण्यास मनाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT