पुढारी वृत्तसेवा
थंडीच्या दिवसात घरातील हवा कोरडी पडते; अशा वेळी कमी काळजीतही घर हिरवेगार ठेवणाऱ्या ८ खंबीर इनडोअर झाडांची खास माहिती जाणून घ्या.
कमी प्रकाश, थंड हवामान आणि अधूनमधून पाणी दिल्यासही सहज तग धरणारे स्नेक प्लांट हे देखभालीसाठी अत्यंत सोपे इनडोअर झाड आहे.
वाढवायला सोपे असलेले मनी प्लांट कोणत्याही प्रकाशात जुळवून घेते तसेच कुंड्यांमध्ये आणि हँगिंग बास्केटमध्येही छान वाढते.
हिरव्या आणि पांढऱ्या लांब, झुकलेल्या पानांचे स्पायडर प्लांट कमी काळजीत वाढते; मात्र कडाक्याच्या थंडीपासून याचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
जाड पानांमध्ये पाणी साठवून ठेवणारी कोरफड ही कमी देखभालीची वनस्पती असून ज्यांना वारंवार पाणी घालायला वेळ नसतो त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
जाड आणि रसाळ पाने असलेले जेड प्लांट पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यास घरात छान वाढते आणि तुलनेने कोरडे वातावरणही सहन करू शकते.
कमी प्रकाशात टिकून राहण्याची क्षमता असलेले झेडझेड प्लांट पाणी साठवणाऱ्या मुळांमुळे थंडीत काही काळ दुर्लक्ष झाले तरीही टिकून राहते.
मोठी आणि चकचकीत पाने असलेले रबर प्लांट खोलीला हिरवागार लुक देते; तापमानातील अचानक बदलांपासून दूर ठेवल्यास ते थंडीतही चांगले राहते.
कमी प्रकाशातही सहज जुळवून घेणारे ॲग्लोनिमा (चायनीज एव्हरग्रीन) आपल्या हिरव्या, चंदेरी किंवा गुलाबी छटांच्या पानांनी थंडीतही घरात रंगत आणते.