मुंबई : मुंबईतल्या प्रसिध्द दगडी चाळीतल्या देवीची ओटी भरण्यासाठी असंख्य महिला दुबई, अमेरिकेतून हवाई मार्गाने मुंबईत दाखल होतात. तसेच आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी देवीकडे साकडे घालत असतात.
दगडी चाळीतल्या देवीकडे महिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असल्यामुळे दरवर्षी ओटी भरणार्या महिलांची रांग वाढतच चालली आहे. विक्रोळी, भांडुप, मुलुंड, पुणे, सांगली सातारा येथून मोठ्या प्रमाणात महिलावर्ग देवीची ओटी भरण्यासाठी दगडी चाळीत येत असतात.
दुबई अमेरिकेसारख्या देशात स्थायिक झालेली मंडळी खास नवरात्र उत्सवासाठी आणि दगडी चाळीतल्या देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दुबई ते अमेरिका अशी वारी करून अनेक महिला दर्शनासाठी येत असल्याची माहिती मंडळाचे सेक्रेटरी अनिल शिंदे यांनी दिली आहे.
मुंबईतल्या पाच देवांचे दर्शन घेण्याची सरकारने काही वर्षांपूर्वी जाहिरात केली होती. त्या जाहिरातीत दगडी चाळीच्या देवीचा देखील समावेश करण्यात आला होता. यंदा राजस्थानमधल्या एका देवीच्या मंदिराप्रमाणे भव्य दिव्य देखावा वेडिंग प्लॅनर गणेश यांनी साकारला असून सदर देखाव्याची चर्चा होत आहे.