Dadar Kabutarkhana Pudhari
मुंबई

Dadar Kabutarkhana: दादरमधील कबुतरखान्याला पारदर्शक ॲक्रेलिकचे कवच; दाणे टाकणाऱ्यांना रोखण्यासाठी महापालिका सतर्क

न्यायालयाच्या बंदीच्या निर्देशांनंतर परिसरात कबुतरांना खाद्य देण्यास मनाई; अनधिकृत वापर रोखण्यासाठी महापालिकेचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दादर येथील ऐतिहासिक असलेला कबुतरखाना न्यायालयाने बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर गेल्या वर्षांभरांपासून सदर परिसरात कबुतरांना खाद्य टाकणे बंद आहे. काही नागरिकांकडून खाद्य टाकणे व अतिक्रमण करणे याला चाप बसविण्यासाठी महापालिकेने आता या कबुतरखान्याला पारदर्शक ॲक्रेलिक शीटने बंदिस्त केले आहे.

यामुळे परिसराचा अनधिकृत वापर करणे व कबुतरांना खाद्य देणाऱ्या नागरिकांना रोखण्यास पालिकेला सोयीचे होईल. जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांनी परिसरावर कडक देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी पक्षीप्रेमी व काही धार्मिक संघटनांकडून होत आहे. दुसरीकडे, कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे कबुतरखान्याचे भवितव्य, सार्वजनिक आरोग्य आणि धार्मिक भावना यांवरील वाद अद्याप कायम आहे.

कबुतरांना दाणे टाकण्यावर असलेल्या बंदीनंतर, सुरुवातीला हा कबुतरखाना अपारदर्शक ताडपत्रीने व मेटल शीट्सने झाकण्यात आला होता. आता महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने ताडपत्री हटवून ४० लाख रुपये खर्च करून पारदर्शक ॲक्रेलिकचे सुरक्षा कवच बसवले आहे. यामुळे ही ऐतिहासिक हेरिटेज वास्तू आता बाहेरून स्पष्टपणे व सुंदर दिसेल. या संरचनेच्या आत व आजूबाजूला ग्रीनरी आणि झाडे लावण्याची योजना आखण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT