Mumbai local Train Pudhari
मुंबई

Mumbai Local Train: मध्य रेल्वेवर खोपोली- कसारापर्यंत 15 डब्यांची लोकल ट्रेन; 34 प्लॅटफॉर्मचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार, वाचा

Central Railway:9 जून रोजी मुंब्रा स्थानकातील अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या मध्य रेल्वे प्रशासनाने फलाटांची लांबी वाढवण्याचं काम हाती घेतलं होतं.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मध्य रेल्वेवरील कल्याण- डोंबिवली, कसारा आणि कर्जत या भागातून येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने 34 स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवण्याच्या कामाला गती दिली असून यामुळे 15 डब्यांच्या गाड्या थांबवणं शक्य होणार आहे.  

9 जून रोजी मुंब्रा स्थानकातील अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या मध्य रेल्वे प्रशासनाने फलाटांची लांबी वाढवण्याचं काम हाती घेतलं होतं. गेल्या आठवड्यात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी देखील मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले होते.

ऑगस्ट अखेरपर्यंत कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जलद मार्गावरील दोन स्थानकांवरील फलाटांचे काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. तर इतर स्थानकांवरील फलाटांचे काम मान्सून संपेपर्यंत पूर्ण होईल.
स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सध्या मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल गाड्या कोणत्या स्थानकांवर थांबतात?

मध्य रेल्वेवर सध्या 15 डब्यांच्या लोकल गाड्या सीएसएमटी- कल्याण मार्गावर धावत आहे. सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7, भायखळ्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4, दादरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 9 A, 11 आणि 12, कुर्लामधील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6, घाटकोपरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4, भांडुप, मुलुंडमधील प्लॅटफॉर्म क्रमांक  3 आणि 4, ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5, 6, 7 आणि 8, डोंबिवलीत प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 तर कल्याणमधील 1, 1A, 4 आणि 5 या प्लॅटफॉर्मवर 15 डब्यांच्या लोकल गाड्या थांबू शकतात.

15 डब्यांच्या लोकल गाड्या वाढवल्याचा फायदा काय?

ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या धिम्या मार्गावरील सर्व स्थानके 15 डब्यांच्या गाड्यांसाठी तयार केली जातील, ज्यामुळे प्रवासी क्षमतेत 25% वाढ होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

15 डब्यांसाठी लांबी वाढवलेले 34 प्लॅटफॉर्म कोणते?

कल्याण-कसारा मार्गावरील स्थानके

कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आठगाव, थानसीट, खर्डी, उंबरमाळी आणि कसारा.

ठाणे-कल्याण मार्गावरील स्थानके

  • ठाणे - प्लॅटफॉर्म 3 आणि 4

  • कळवा - प्लॅटफॉर्म 1 आणि 2

  • मुंब्रा - प्लॅटफॉर्म 1 आणि 2

  • दिवा - प्लॅटफॉर्म 1 आणि 2

  • कोपर - प्लॅटफॉर्म 1 आणि 2

  • डोंबिवली - प्लॅटफॉर्म 2 आणि 3

  • ठाकुर्ली - प्लॅटफॉर्म 1 आणि 2

  • कल्याण - प्लॅटफॉर्म 2 आणि 3

कल्याण-खोपोली मार्गावरील स्थानके

कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, भिवपुरी, कर्जत, पळसदरी, केळवली, डोळवली, लोवजी आणि खोपोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT