मुंबई उच्च न्यायालय / Mumbai High court  pudhari file photo
मुंबई

Maternity Leave: कंत्राटी महिला डॉक्टरला प्रसूती रजा द्या; उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला दणका

मातृत्वाचा सन्मान राखा; केवळ कंत्राटी नियुक्तीचा आधार देत हक्क नाकारू नका, न्यायालयाचे स्पष्ट निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा हक्क नाकारणाऱ्या मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत फटकारले. नोकरदार महिलांची संख्या वाढत असताना केवळ तांत्रिक कारणावरून महिलांना प्रसूती रजा नाकारणे चुकीचे आहे. पालिका प्रशासनाने मातृत्वाचा सन्मान राखावा, असे बजावत न्यायालयाने केईएम रुग्णालयातील महिला डॉक्टरला प्रसूती रजेचे लाभ देण्याचे आदेश दिले.

केईएम रुग्णालयात भूलशास्त्र विभागात काम करीत असलेल्या डॉ. धनश्री कारखानीस यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रियाझ छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कारखानीस 4 जानेवारी 2022 पासून कंत्राटी तत्त्वावर साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये त्यांनी प्रसूती रजेसाठी अर्ज केला होता.

मात्र, कंत्राटी कर्मचारी असल्याच्या कारणावरून तसेच सेवा नियमांनुसार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुट्ट्या लागू नसल्याचे कारण देत पालिकेने 21 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. तो निर्णय अन्यायकारक असल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती छागला यांच्या खंडपीठाने नोंदवले.

आर्थिक स्वावलंबनासाठी काम करणाऱ्या महिलांना बालकाची काळजी घेण्याच्या कर्तव्याशी तडजोड करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. केवळ नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची आहे म्हणून प्रसूती सुट्टीचा घटनात्मक आणि कायदेशीर अधिकार नाकारता येणार नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT