Maharashtra Politics
मुंबईः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार की नाही, याबाबत आघाडीत अद्यापही स्पष्टता नसल्याचे चित्र आहे. या निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल, असे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे है एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सपकाळ आणि ठाकरे यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. या निवडणुका कशा लढाव्या, याबाबत दोन्ही पक्षांच्या काही भूमिका आहेत.
या निवडणुकीसाठी काँग्रेसने स्थानिक नेतृत्वाला आघाडीचे अधिकार दिले असल्याची माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांना दिली. या निवडणुकीची अधिसूचना निघाल्यावर मित्रपक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत भेण्याचा आमचा विचार आहे, अशी भूमिका सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.