CNG, PNG expensive from today!
वाढत्या मागणीमुळे नैसर्गिक वायू आयात करावा लागत असल्याने महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे.  CNG File Photo
मुंबई

CNG price hike : आजपासून सीएनजी, पीएनजी महागला!

पुढारी वृत्तसेवा

मुंबई | CNG price hike : वाढत्या मागणीमुळे नैसर्गिक वायू आयात करावा लागत असल्याने महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. मंगळवार 9 जुलैपासून नवे दर लागू होणार आहेत. मुंबई आणि परिसरात सीएनजी आता दीड रुपये आणि पीएनजी एक रुपयाने महागला आहे. यामुळे येत्या काळात रिक्षा-टॅक्सीचा प्रवासही महागणार आहे.

देशांतर्गत गॅस वाटपातील तुटवडा आणि सीएनजी-पीएनजीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडला अतिरिक्त बाजारातील नैसर्गिक वायू आयात करावा लागत असल्याने गॅसची किंमत वाढली आहे.

गॅसच्या किमतीतील वाढ अंशतः भरून काढण्यासाठी महानगर गॅसने सोमवार 8 जुलैच्या मध्यरात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीच्या किमतीत प्रतिकिलो दीड रुपया तर पीएनजीच्या किमतीत एक रुपयाने वाढ केली आहे. सीएनजी प्रतिकिलो आता 75 रुपये तर पीएनजी 48 रुपये दराने मिळणार आहे.

SCROLL FOR NEXT