Devendra Fadnavis Pudhari
मुंबई

CIDCO Connectivity Projects: नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला मिळणार नवी गती! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज प्रकल्पांचे लोकार्पण

नवी मुंबईतील वाहतूक संपर्क सुधारण्यासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण; प्रकल्पांमुळे नागरिकांना होणाऱ्या फायद्यांकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: नवी मुंबई सिडको क्षेत्रातील नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन, भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटप तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील जोडणीसाठी विकसित करण्यात आलेल्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांनी दिली. आज २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता डीपीएस स्कूलजवळील मैदान, शिरढोण, पनवेल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, गणेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सिडकोकडून विकसित करण्यात आलेल्या एसबीआर-९, बीआर-४, बीआर-५ आणि उरण बायपास पूल या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

या प्रकल्पांमुळे पुणे, पनवेल, ठाणे व कल्याण या दिशांनी येणाऱ्या प्रवाशांना उलवे, बेलापूर, अटल सेतू, उलवे कोस्टल रोड व आम्र मार्गाशी सुलभ आणि अखंड जोडणी मिळून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारी वाहतूक अधिक सुरळीत, जलद व सिग्नलमुक्त होण्यास मदत होईल.

तसेच उरण बायपास पुलामुळे उरण शहर आणि रेल्वे स्थानकादरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होऊन नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांनी दिली.

नैना टीपीएस (टाऊन प्लॅनिंग स्कीम) प्रकल्पात सहभागी झालेल्या भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटप करण्यात येणार असून, नैना टीपीएसमधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांचे भूमिपूजन होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT